गणेश उत्सव सणाची संपूर्ण माहिती | Ganesh Utsav Information In Marathi 2023

nandkishor
गणेश उत्सव सणाची  संपूर्ण माहिती Ganesh Utsav Information In Marathi 2023
गणेश उत्सव संपूर्ण माहिती 
हिंदु धर्माचे आराध्यदेवत श्री गणेश! भाद्रपद महिन्यातील शुध्द चतुर्थी या दिवशी येणारा गणेशोत्सव सण आजही आपले हिंदु बांधव मोठया उत्साहात,आनंदाने आणि चैतन्याने साजरा करतात. हे आपण पाहतच आहोत.

श्री गणपती ही बुध्दीची देवता आहे.आणि कोणतेही कार्य सुरू करण्याच्या अगोदर त्यांचे प्रथम पूजन (पूजा) करण्याची प्रथा आहे. प्रत्येक हिंदुच्या हृदयामध्ये या गणेशा वरील आदराची भावना खूप मोठ्या प्रमाणात विराजमान आहे.

{tocify} $title={Table of Contents}

गणेश उत्सव संपूर्ण माहिती

घराघरात आणि सर्व मांडला मध्ये विराजमान होणारा बाप्पा येतांना चोहीकडे आनंदाचे उत्साहाचे वातावरण घेऊन येतो. त्याच्या आगमना ची तयारी कितीतरी दिवस आधीपासुन तयारी सुरू होते. उदा.मंडपाचे डेकोरेश, सजावट ,गणपती काळातील नियोजने आणखी बरेच काही. प्रत्येक जण आपल्या पंरपंरेप्रमाणे आणि श्रद्धेनुसार त्याची पुजा अर्चना करतात.

काही ठिकाणी गणेशजी संपुर्ण दहा दिवस,तर काही ठिकाणी पाच दिवस, काही ठिकाणी दिड दिवस तर कुठे अगदी एक दिवसाकरीता देखील विराजमान होतो.

श्री गणेशाची मुर्ती

श्री गणेशाची मुर्ती ही मातीपासून बनवलेली असावी असा नियम आहे. साधारणतः शाडु मातीपासून बनवलेली किंवा काळया मातीपासून बनवलेली मुर्ती देखील चालेल परंतु साध्याच्या काळामध्ये प्लॅस्टर ऑफ पॅरीस पासून बनवलेल्या मुर्तींची प्रतिष्ठापना करत आहेत. परंतु या मूर्ती पर्यावरणाकरता हानिकारक असल्याने आपण मातीच्याच मूर्ती बसवाव्यात.

प्रतिष्ठापनेची पुजा

श्री गणेशाची प्रतिष्ठापना करतांना मुर्तीचे आवाहन, पुजन, अभिषेक, अत्तर फुलं ,दुर्वा पत्री अर्पण करून अखेर नैवेद्य(मोदक) आणि आरती अशी प्रथा आहे.

भाद्रपद महिन्यामध्ये पावसाळ्याचे दिवस असतात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते आणि विविध वनस्पती नव्याने उगवलेल्या असतात. त्यामुळे सोळा पत्री श्री गणेशाला अर्पण करण्याची प्रथा आहे. या पत्रींमधे अधिकतर पत्री या औषधी असल्याचे आपल्याला आढळते.

पुराणकथा

पुराणामध्ये या सणाविषयी माहिती मिळवली असता असे समजते की माता पार्वतीला एकदा स्नानाकरता जायचे असतांना बाहेर कुणी पहारेकरी नसल्याने तिने मातीची एक मुर्ती बनवुन त्यात प्राण फुंकले त्याला पहारेकरी नेमुन ती स्नानाला गेली असता बाहेर भगवान शंकर आले.

पहारेकऱ्याने त्यांना रोखले असता त्यांनी संतापुन त्याचा शिरच्छेद केला. माता पार्वती स्नानाहुन आल्यानंतर झालेल्या प्रकाराने ती प्रचंड संतापली आणि क्रोधीत झाली. तिचा क्रोध शांत करण्याकरता भगवान शंकराने आपल्या सेवकांना प्रथम जे कोणी दिसेल त्याचे शिर आणावयास सांगितले सेवक हत्तीचे शिर घेउन आले असता ते शिर त्या धडावर बसविण्यात आले.

तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातीळ शुध्द चतुर्थीचा दिवस होता आणि तेंव्हापासुन श्री गणेश उत्सव सुरू होण्याची प्रथा सुरू झाली.

भगवान श्री गणेशाला दुर्वा आवडीच्या असल्याने त्यांच्या शिरावर वाहाण्याची प्रथा आहे.

त्याचप्रमाणे नैवैद्यामध्ये मोदक अतिप्रीय असल्याने गणरायाला मोदकांचा नैवेद्य दाखविण्यात येतो.

सार्वजनिक गणेशोत्सव इतिहास मराठीमध्ये

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी या उत्सवाची सुरूवात केली होती.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही.

गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं, असं इतिहासकार बिपान चंद्रा यांचं मत आहे.

अनेक ठिकाणी गणेश मंडळाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते.

सगळ्या भारतात विशेषतः महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होणारा सण आहे. या सणामध्ये असंख्य हातांना रोजगार उपलब्ध होतो. कोटयावधी रुपयाची उलाढाल होतांना आपल्याला पहायला मिळते.

सगळ्या बाजारपेठा सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तुंनी भरलेली दिसतात. मुर्तीकारांची लगबग तर कित्येक महिने आधीपासुन सुरू झालेली पहायला मिळते.

गणपतीची आरती 1

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ, मुक्ताफळांची॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥३॥

गणपतीची आरती 2

शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंदिल लाल विराजे सुत गौरीहरको ।
हाथलिये गुडलड्डू साई सुरवरको ।
महिमा कहे न जाय लागत हुं पदको ॥१॥

जय जयजी गणराज विद्या सुखदाता ।
धन्य तुमारो दर्शन मेरा मन रमता ॥धृ॥

अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।
विघ्नविनाशन मंगल मूरत आधिकारी ।
कोटीसूरज प्रकाश ऎसी छबी तेरी ।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबहारी ॥जय.॥२॥

भावभगतिसे कोई शरणागत आवे ।
संतति संपत्ति सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।
गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥ जय.॥३॥

मुंबईतीमधील गणेशोत्सव –

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा होत असला तरी देखील मुंबईमधील गणेशोत्सवाला वेगळेच महत्व आहे. मोठं-मोठ्या गणेश मुर्ती हे मुंबईतील गणेशोत्सवाचं आगळं वेगळं वैशिष्टय आहे.

मुंबईमधील लालबागचा राजा हा गणपती फार प्रसिध्द असुन महाराष्ट्रातुन लांबुन लोक या गणेशाच्या दर्शनासाठी, नवस बोलण्यासाठी आणि फेडण्यासाठी येथे येतात. या गणेशाचे दर्शन करण्यासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसुन येतात.

गणपतीची विविध नावे -108 

अखूरथ,अनंतचिदरुपम,अमित,अलंपत,अवनीश,अविघ्न,
ईशानपुत्र, उद्दण्ड, उमापुत्र, एकदंत, एकदंष्ट्र, एकाक्षर,
कपिल, कवीश, कीर्ति, कृपाकर, कृष्णपिंगाक्ष, क्षिप्रा,
क्षेमंकरी, गजकर्ण, गजनान, गजवक्त्र, गजवक्र,
गजानन, गणपति, गणाध्यक्ष, गणाध्यक्षिण, गदाधर, गुणिन,
गौरीसुत, चतुर्भुज, तरुण, दूर्जा, देवदेव, देवव्रत,
देवांतकनाशकारी, देवेन्द्राशिक, द्वैमातुर, धार्मिक, धूम्रवर्ण,
नंदन, नमस्तेतु, नादप्रतिष्ठित, निदीश्वरम, पाषिण, पीतांबर,
पुरुष, प्रथमेश्वर, प्रमोद, बालगणपति, बुद्धिनाथ, बुद्धिप्रिय,
बुद्धिविधाता, भालचन्द्र, भीम, भुवनपति, भूपति, मंगलमूर्ति,
मनोमय, महागणपति, महाबल, महेश्वर, मुक्तिदायी, मूढ़ाकरम,
मूषकवाहन, मृत्युंजय, यज्ञकाय, यशस्कर, यशस्विन, योगाधिप,
रक्त, रुद्रप्रिय, लंबकर्ण, लंबोदर, वक्रतुंड, वरगणपति,
वरदविनायक, वरप्रद, विकट, विघ्नराज, विघ्नराजेन्द्र, विघ्नविनाशन,
विघ्नविनाशाय, विघ्नहर, विघ्नहर्ता, विघ्नेश्वर, विद्यावारिधि, विनायक,
विश्वमुख, वीरगणपति,शशिवर्णम,शांभवी,शुभगुणकानन, शुभम,
शूपकर्ण, श्वेता, सर्वदेवात्मन, सर्वसिद्धांत, सर्वात्मन, सिद्धिदाता,
सिद्धिप्रिय, सिद्धिविनायक, सुमुख, सुरेश्वरम, स्कंदपूर्वज, स्वरुप, हरिद्र, हेरंब

भारतातील 10 प्रसिद्ध गणपती आणि त्यांची ठिकाणे 


श्री सिद्धीविनायक मंदिर

मुंबई

श्रीमंत दगडूशेठ हलवाई

पुणे

कनिपकम विनायक मंदिर  

चित्तूर

मनकुला विनायक मंदिर

पुडुचेरी

मधुर महागणपती मंदिर

केरळ

रणथंबौर गणेश मंदिर  

राजस्थान

मोती डूंगरी गणेश मंदिर  

जयपूर

गणेश टॉक मंदिर जयपूर

जयपूर

गणपती मंदिर

रत्नागिरी

उच्ची पिल्लयार मंदिर  

तामिळनाडू


गणेश विसर्जन –

अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जना वेळी प्रत्येकाचे मन भावुक झाल्याचं दिसतं. दहा दिवस एखादा पाहुणा आपल्या घरी यावा आणि दहाव्या दिवशी तो परत निघावा असं होऊन जातं.

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” हा जयघोष आकाशात घुमत असतो. आणि बाप्पाची मुर्ती पाण्यात जातांना मनात कालवाकालव होते.

सर्वजण आनंदाने बाप्पाला निरोप देतात.त्यावेळी लेझीम,टिपऱ्या,झांज पथक असे बरेच पारंपरिक वाद्य वाजवत बाप्पाला विसर्जित करतात

“वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभः
निर्विघ्नं कुरूमे देव सर्वकार्येषु सर्वदा”

आशा करतो ही गणेशोत्सवाची संपूर्ण माहिती व सुरवात आणि इतिहास हा लेख नक्कीच आवडला असेल!



1 टिप्पणी

  1. Very true
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
×